खुशखबर ! ‘सोनं-चांदी’ झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव 130 रुपयांनी घसरले. यामुळे दिल्लीत सराफ बाजारात सोने 38,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मंदीमुळे सोन्याच्या भावात घसरणं आल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सोन्याच्या किंमती 38,650 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या.

सोन्या बरोबरच चांदीच्या किंमतीत मंगळवारी घसरण झाली. चांदी मंगळवारी 90 रुपयांनी घसरली. यामुळे चांदी 45,080 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदी सोमवारी 45,170 रुपये प्रति किलो ग्रॅम होती. उद्योगात असलेली चांदीची कमी मागणी आणि शिक्के व्यापारात कमी आल्याने चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले ती दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 130 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. पटेल म्हणाले की सोन्यात जागतिक बाजारात घसरण होत असल्याने किंमतीत घसरण आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये घसरणीबरोबर 1,453 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 16.81 डॉलर प्रति औंस झाली. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे सोन्या चांदीच्या किंमतीत या महिन्याच्या सुरुवातीपासूनच घसरण पाहायला मिळाली.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like