खुशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे अनेक उद्योग ठप्प झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये काही उद्योग सुरु करण्यात आले आहे. सोने बाजार देखील लॉकडाऊनमध्ये बंद होता तो अनलॉकमध्ये काही प्रमाणात पुन्हा सुरु होऊ लागला आहे. एवढ्या दिवसात झालेले नुकसान भरून काढण्याचे लक्ष सोने व्यापाऱ्यांसमोर आहे. सोन्याच्या किंमती सध्या 47 हजारांपेक्षा जास्त आहेत.

स्पॉट आणि वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत रोज बदल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर वर-खाली होत आहेत. सोन्याच्या स्पॉट किंमतीप्रमाणेच वायदे बाजारातही मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतो. गुरुवारी देखील वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये बदल झाला आहे. आज वायदे बाजारात सोन्याचे दर काहींसे कमी झाल्याचे पहायला मिळालं.

एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट 2020 च्या सोन्याची किंमत गुरुवारी सकाळी 63 रुपयांनी कमी झाली. परिणामी या सोन्याची किंमत प्रति तोळा 47 हजार 275 रुपयांवर पोहोचली आहे. 5 ऑक्टोबरसाठी सोन्याचे भाव देखील आज सकाळी 53 रुपयांनी कमी होत दर प्रति तोळा 47 हजार 445 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आज (गुरुवारी) सकाळी स्पॉट आणि वायदा बाजार दोन्ही ठिकाणी सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. एका मीडिया अहवालानुसार आज सकाळी सोन्याचा वायदा भाव 1736.20 डॉलर प्रति औस एवढा होता. तर सोन्याची स्पॉट किंमतीतही वाढ होऊन ती 1727.29 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

देशांमध्ये ज्याप्रमाणे सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीत देखील आज बदल झाल्याचे पहायला मिळाले. चांदीच्या किंमती एससीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी सकाळी 213 रुपयांनी खाली आल्या. परिणामी आज चांदीचे दर 48 हजार 223 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. स्पॉट आणि वायदे बाजारात चांदीची घसरण झाल्याचे पहायला मिळाले.