Gold Price Today : सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण; जाणून घ्या दर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. काही दिवस भाव वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे मूल्य मजबूत झाल्याने सराफा बाजारामध्ये प्रति दहा ग्रॅमसाठी सोन्याची किंमत 440 रुपयांनी कमी झाली आहे.

सोन्याचे दर 440 रुपयांनी कमी झाले असले तरी चांदी अधिक स्वस्त झाली आहे. आज चांदीचा प्रतिकिलो दर 63,628 रुपयांवर आला आहे. सराफा बाजारामध्ये सोन्याचे आजचे दर 47,445 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता. मंगळवारी सराफा बाजारामध्ये जून वायदा असलेल्या सोन्याच्या दरात 0.04 टक्क्यांनी घट झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचा दर 0.1 टक्क्यांनी घसरला आहे. तो आता 1,777.93 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. तसेच औद्योगिक मागणी घटल्याने एक किलोग्रॅम चांदीचा दर 69.329 रुपयांवरून घसरून 68,623 रुपये एवढा झाला आहे.

सोन्याचा दर काय?

– दिल्लीत 46,240 रुपये प्रति दहा ग्रॅम

– चेन्नईमध्ये 44,690 रुपये प्रति दहा ग्रॅम

– कोलकातामध्ये 47,430 रुपये प्रति दहा ग्रॅम