Gold Price Today : सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने चांदीच्या किंमतीत वारंवार बदल होताना दिसत आहे. देशातील बाजारात सोन्या-चांदीच्या दरात कधी घसरण तर कधी वाढ झाल्याची दिसून येते. तर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर खालावले आहे. तर आजचा सोन्याच्या दरात ९६ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर ४६,३२० रुपये इतका झाला आहे. तसेच चांदीची किंमत २२८ रुपयांनी कमी झाली आहे. तर सध्या चांदीची किंमत प्रति किलो ६६,४०५ रुपये इतकी झाली आहे.

दरम्यान, दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याची किंमत मध्ये प्रति १० ग्रॅम ४५,१८१ रुपये होते. त्यात ५८७ रुपयांची वाढ झाली.यानंतर २४ कॅरेट सोनं आता ४५,७६८ रुपये इतके झाले होते. आणि चांदीच्या दरात ६८२ रुपयांच्या तेजीनंतर दर ६५,४६८ रुपये प्रति किलो झाले होते. तसेच, आंतराष्ट्रीय बाजारात आज याठिकाणी सोन्याचा भाव स्थीर आहे. बुधवारी याठिकाणी ०.३ टक्क्याने घसरण होऊन सोन्याचा भाव १,७३७,०२ डॉलर प्रति औंस होते. आणि चांदीची किंमत ०.०५ डॉलरच्या घसरणीनंतर २५.११ डॉलरच्या स्तरापर्यंत होता.

आजचे सोन्याचे दर-

दिल्ली –
२४ कॅरेट : ४८,८८० रुपये

मुंबई –
२४ कॅरेट : ४५,३५० रुपये

चेन्नई –
२४ कॅरेट : ४७,२८० रुपये

कोलकत्ता
२४ कॅरेट : ४७,२८० रुपये