खुशखबर ! सोनं आणि चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतत वाढणारे सोन्याचे भाव आज कमी झाले आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे सोने 38,905 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. चांदीचे भाव देखील कमी झाले असून आज चांदी 290 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे चांदी 48,028 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. काल झालेले वाढीनंतर आज सामान्यांना सोन्या चांदीच्या दराने थोडा दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत.

काल दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भावात 460 रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर 38,860 रुपये प्रति ग्राम झाले होते. तसेच चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली होती. चांदीचे दर 1 किलोमागे 47,957 रुपये झाले होते. त्यानंतर आज सोन्या चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत.

मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या भावात कमी आली असून 1,497 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदी 17.81 डॉलर प्रति औंस झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या किंमती अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपया घसरल्याने सोन्याचा भाव वाढले आहेत.