खुशखबर ! विक्रमी ‘उच्चांकी’ गाठल्यानंतर सोनं झालं ‘स्वस्त’, चांदीत देखील ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय बाजारात मागच्या सत्रात विक्रमी पातळी गाठल्यानंतर सोन्याचा भाव आज घसरला आहे. एमसीक्सवर ऑगस्टचा सोन्याचा भाव ०.१२ टक्क्यांनी घसरून ४८,०७४ रुपये प्रति १० ग्राम झाला. मागच्या सत्रात ४८,५८९ रुपये प्रति १० ग्राम भाव होता.

चांदीच्या भावात घट दिसून आली. जुलैमध्ये एमसीक्सवर चांदीचा भाव ०.१४ टक्क्यांनी घसरून ४७,७२१ रुपये प्रति किलो झाला. सोन्याच्या भावात जागतिक बाजारात मागच्या आठ वर्षातील सर्वात मोठी तेजी दिसून आली होती. सध्या जगात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या मंदीमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे.

तसेच जागतिक बाजारात सोन्याचा भावही ०.२ टक्क्यांनी वाढून १७६४.२० डॉलर प्रति औस झाला. मागच्या सत्रात हा भाव १७७९.०६ डॉलर प्रति औसवर होता.

मुंबईत सोन्याच्या किरकोळ वाढीसह चांदीही वाढली
सोन्याच्या भावात आजही तेजी दिसून आली. आज सोन्याचा भाव १० रुपये प्रति १० ग्रामने वाढला आहे. आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,४१९ रुपये प्रति १० ग्राम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ४७,४१० रुपये प्रति १० ग्राम आहे. सोन्यासह चांदीतही १० रुपये वाढ झाली आहे. त्यानुसार चांदीचा आजचा भाव ४८,४६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव काल ४८,४०० रुपयांवर बंद झाला, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,४०० वर बंद झाला.

जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव
मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, सांगली आणि बारामती या शहरांमध्ये आजचा २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ४८,४१० रुपये आहे आणि कालचा भाव ४८,४०० रुपये होता. याच शहरांमध्ये २२ कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव ४७,४१० रुपये आहे आणि २२ कॅरेटचा कालचा भाव ४७,४०० रुपये होता.

राज्यातील काही प्रमुख शहरातील चांदीचा भाव
मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, सांगली आणि बारामती या शहरांमध्ये आजचा चांदीचा भाव ४८,४६० रुपये आहे आणि कालचा भाव ४८,४५० रुपये होता.