Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आज शुक्रवारी (दि. 20) सलग पाचव्या सत्रात सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याला स्थिरस्थावर होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सोने आणि चांदीवर (gold-and-silver-rate) नफावसुलीचा दबाव कायम राहिल्याने सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा भाव (gold- rate) प्रति 10 ग्रॅम 50,156 रुपये आहे. त्यात 164 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी सोने 49, 992 रुपयांवर बंद झाले होते. चांदीमध्ये आज तेजी आहे. चांदीचा भाव (silver-rate) एक किलोला 61 हजार 924 रुपये आहे. त्यात 414 रुपयांची वाढ झाली आहे. मागील सत्रात सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीचा भाव 1000 रुपयांनी कमी झाला होता. कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या यशस्वी चाचण्यांनी भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली होती. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला होता. मात्र, अमेरिकेत करोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 0.2 टक्क्यांनी कमी झाला असून, तो प्रतिऔस. 1863.21 डॉलर झाला आहे. चांदीचा भाव प्रतिऔंस 0.1 टक्क्यांनी घसरला असून, तो 24.06 डॉलर आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात नफावसुली दिसून आली. त्यामुळे सोन्याचा भाव 1900 डॉलर खाली आल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे. नजीकच्या काळात सोन्यात चढ उतार दिसून येतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

(goodreturns) या वेबसाइटनुसार शुक्रवारी (दि. 20) मुबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,860 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 50,860 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 49, 347 असून, 24 कॅरेटचा भाव 53, 850 रुपये आहे. कोलकात्यात 22 कॅरेटसाठी ग्राहकांना 50,050 रुपये मोजावे लागत आहेत, तर 22 कॅरेटचा भाव 52450 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेटचा सोन्याचा दर 47, 450 रुपये असून, 24 कॅरेटसाठी 51,830 रुपये एवढे मोजावे लागणार आहेत.