‘उच्चांकी’ गाठल्यानंतर सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीला सोन्याचा किंमती वधारत असताना आता मात्र सोन्याने सामान्याला काहीसा दिलासा दिला आहे. 40,000 रुपये पार केलेल्या सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यानंतर दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे 39,720 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहचले.

गुरुवारी सोन्याचे भाव 250 रुपयांनी वाढून 40 हजार 220 रुपयापर्यंत पोहचले होते. त्यानंतर आज सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण होऊन ते 39,750 रुपये झाले. चांदीच्या किमंतीत देखील घट झाली असून चांदीचे भाव 48 हजार 600 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

अमेरिका आणि चीनमधील व्यापर युद्धामुळे सोन्याच्या भावात उतारचढाव येत आहेत. त्याचा थेट परिणाम सराफ बाजारातील सोन्याच्या भावावर होत आहे. परंतू सध्या जग मंदीने धास्तावले आहेत, पण सोन्यात गुंतवणूक करणे सध्या सुरक्षित मानले जात आहे, याकारणाने सोन्याची मागणी वाढली आहे. परंतू आज सोन्याच्या किंमतीत थोडी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –