Gold Rates Today : सोन्याचांदीला पुन्हा ‘चमक’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लग्नसराईमुळे गेल्या काही दिवसापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार दिसून येत आहे. सोन्याच्या दरात बुधवारी (दि. 5) तेजी दिसून आली. तर चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. एमसीएक्सवर जूनसाठीच्या सोन्याची वायदे किंमत 0.26 टक्क्यांनी वाढली आहे. त्यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा 46,993 रुपयावर आहेत. तर चांदीच्या दरात 0.56 टक्क्यांची वाढ झाली असून चांदीचे दर 70,039 रुपये प्रति किलो झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56, 200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर गेले होते. त्यानंतर रेकॉर्ड हायवरून सोन्याचे दर जवळपास 9, 000 ते 10,000 हजारांनी कमी झाले आहेत.

का वाढत आहेत सोन्याचे भाव ?

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयांमध्ये आलेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. तसेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी सोन्याकडे गुंतवणूकदार एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत असल्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे ते म्हणाले.

कसे ओळखाल शुध्द सोने ?

आपल्याला सोन्याची शुध्दता तपासून पाहयची असेल तर त्याकरिता सरकारकने एक अ‍ॅप तयार केले आहे. बीआयएस केअर अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासता येते. या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधीची तक्रार देखील करू शकता. अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहकांना तक्रार करता येते.