5 दिवसांच्या घसरणीनंतर ‘सोनं-चांदी’ महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोमवारी सोने 5 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा तेजीत येताना दिसले. आज सोने 50 रुपयांनी महागले असून 39,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. या दरम्यान चांदीच्या किंमती देखील वाढल्या आहेत. चांदी चकाकून 150 रुपयांनी महागली आहे. यामुळे चांदी 45,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कमी किंमतीला होणाऱ्या लिलावामुळे सोन्यात तेजी येताना दिसत आहे. अमेरिका आणि चीनच्या दरम्यान सुरु असलेले व्यापार युद्ध अजूनही चर्चेत आहे. यावर अजूनही तोडगा निघाला नाही. तसेच जागतिक स्तरावर असलेली मंदी कायम आहे. या दरम्यान गुंतवणूकदारांनी कमी किंमतीत सोने खरेदी केल्याने सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे.

लंडन आणि न्यूयॉर्ककडून प्राप्त माहितीनुसार सोने हाजिर आज 5.65 डॉलरने वाढून 1,464.55 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकी सोने वायदा देखील 2.30 डॉलरने वाढून 1,465.20 डॉलर प्रति औंस झाले आहे. चांदी 0.14 डॉलरने वाढून 16.88 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Visit : Policenama.com