Corona Vaccine Impact : लसीकरणामुळे सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात आजपासून शनिवार (दि. 16) कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर आज सोन आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा दर 500 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची घसरण झाली आहे. कोरोना लसीकरण आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरता निवळल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. मुंबईत सोन्याचा भाव आता 47 हजार 910 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर एका किलोमागे 64, 980 रुपये इतका झाला आहे. MCX च्या माहितीनुसार, गुरुवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रम 49, 22 1रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यात 133 रुपयांची घसरण होऊन 49,088 रुपये इतका झाला होता. त्यानंतर सोन्याच्या भावात किंचत वाढ होऊन 49,145 रुपये इतका झाला होता. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार शनिवारी मुंबईत 222 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम मागे 47, 910 रुपये इतका झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48, 910 इतका झाला आहे. चेन्नईत 22 कॅरेटसाठी 46,080 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 50, 270 रुपये आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48, 410 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 51, 110 रुपये आहे.