दोन वर्षाच्या मुलाच्या घशातून काढला सोन्याचा मणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात एका दोन वर्षाच्या मुलाच्या घशातून चक्क सोन्याचा मणी काढण्यात आला आहे. हा सोन्याचा मणी जवळपास दीड सेंटिमीटरचा आहे. दोन दिवस हा मणी या मुलाच्या स्वरयंत्राला चिटकून होता. या मुलाला श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्याने त्याच्या आई वडिलांकडून त्याला ससून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर डॉक्टर संजय सोनावले आणि टीम ने उपचार केले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन वर्षाच्या अभिजीतचे आई वडील अभिजीतला भात खाताना ठसका लागला म्हणून ससून रुग्णालयात घेऊन आले होते. अभिजीतला श्वास घ्यायला त्रास होत होता . मधेच तो काळा निळा होत होता. त्यामुळे त्याचे आई वडील चांगलेच घाबरले होते. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे डॉक्तरांनी त्याला कृत्रिम श्वास दिला . त्यानंतर त्याच्या छातिचा एक्सरे काढण्यात आला पण त्यात काही समस्याच आढळून आली नाही . त्यानंतर ताबडतोब डॉक्टर सोनावणे यांनी त्या मुलाच्या घशाचा एक्सरे काढण्याचे ठरवले . या एक्सरे रिपोर्ट मध्ये या मुलाच्या घशात दीड सेंटिमीटरची वस्तू आढळून आली . त्यानंतर भूलतज्ञ डॉक्टर माया जामकर आणि त्यांच्या टीम ला त्वरित बोलावून घेतले . काही वेळातच या दोन वर्षाच्या अभिजीतच्या घशातून दीड सेंटिमीटरचा सोन्याचा मणी काढण्यात आला . हा मणी सर्व बाजूने गुळगुळीत असल्यामुळे काढण्यास अडचण निर्माण होत होती.
[amazon_link asins=’B07F84YVD9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’778096c6-9a35-11e8-8567-dfe45ac38bf9′]

विशेष म्हणजे अभिजीतच्या गळ्यात अडकलेल्या सोन्याच्या मन्याला दोरा ओवण्याचे छिद्र होते. त्याद्वारे या मुलाला श्वास घेता येत होता. आणि म्हणूनच दोन दिवस झाले असुन देखील अभिजीतला श्वास घेता येत होता. हा मणी स्वरयंत्राला चिकटून बसला होता. या उपचाराकरिता ससूनच्या डॉक्टर सोनावले यांचे सहकारी डॉक्टर सुश्रुत देशमुख ,डॉ विजया राऊत ,डॉ हनीफ खान ,डॉ किरण अबनावे तसेच डॉ पूजा गम्भीरे यांनी सहकार्य केले.
[amazon_link asins=’B072JBHDTH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4006a99d-9a36-11e8-a44e-9bf9b65651e8′]

या उपचारानंतर डॉक्टर सोनावणे यांनी ३ वर्षापर्यंतच्या मुलांना छोट्या प्लास्टिकच्या वस्तू , सीताफळाच्या बिया , शेंगदाणे , चिंचोके अशा वस्तू देऊ नयेत असे आवाहन केले आहे. तसेच लहान मणी दागिने आशा वस्तू पासून लाहान मुलांपासून लांबच ठेवावयात असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.