आईस्क्रिम खाण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आईस्क्रिम खाण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना वानवडी येथे सिक्रेड हर्ट सोसायटीच्या समोर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी दुचाकीस्वारांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात सीमा योगेश परुळेकर (७२, सोपानबाग हाऊसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा परुळेकर या त्यांच्या मैत्रिणसोबत आईस्क्रिम खाण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सिक्रेड हर्ट सोसायटीसमोरील हॉटेल अपसाऊथ जवळ आल्यावर अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते करत आहेत.

You might also like