खुशखबर ! सलग चौथ्या दिवशी ‘सोन्या-चांदी’च्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या भावात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पहायला मिळाली आहे. त्यामुळे सोनं सलग 4 थ्या दिवशी स्वस्त झाले आहे. आज सराफ बाजारात सोने 170 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम मागे 38,390 रुपये झाले. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याची घोषणा केल्यानंतर सोनं देखील स्वस्त झाले. आज चांदीच्या दरात देखील कपात झाली असून चांदी देखील आज 120 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे सराफ बाजारातील चांदीचे दर 47,580 रुपये प्रति किलो झाले.

शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये सोने 1,503 डॉलर प्रति औंस आहे तर चांदी 17.87 डॉलर प्रति औंस वर आहे. बाजारात आज सेन्सेक्सने 2,284.55 अंकावर तेजी घेतली. रुपया आज डॉलरच्या तुलनेत 40 पैसे मजबूत असल्याचे पहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण आणि स्थानिक बाजारात मागणी घसरल्याने सोन्याच्या किंमती सलग चौथ्या दिवशी उतरल्या आहेत. राजधानी दिल्लीत काल 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती 270 रुपयांनी खाली आल्या. त्याचबरोबर काल चांदीची किंमत 380 रुपयांनी घसरून 47,310 रुपये प्रतिकिलो झाली होती. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किंमती घसरून होऊन 38,390 रुपयांवर आल्या आहेत.

परंतू आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या किंमतीत अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपयाच्या अस्थिरतेमुळे सोन्याचा भाव देखील कमी जास्त होताना दिसत आहेत.

Visit – policenama.com