खुशखबर ! सलग 5 व्या दिवशी ‘सोनं-चांदी’ झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात सोन्या चांदीत घसरण होताना पाहायला मिळत आहे. यामुळे दिल्ली सराफ बाजारात देखील शनिवारी सोने स्वस्त झाले. सोनं 200 रुपयांनी स्वस्त होत 39,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. हा दर 12 ऑक्टोबरनंतरचा सर्वाच कमी दर आहे. चांदी देखील 400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे चांदी 45,450 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 1 ऑक्टोबरनंतर हा सर्वात कमी दराचा स्तर आहे.

सोन्या चांदीत मागील 5 दिवसात घसरण होताना दिसत आहे. या पाच दिवसात सोने 815 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी देखील 2650 रुपयांनी स्वस्त झाली.

लंडन, न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोने 9.05 डॉलरने घसरुन 1,459.50 डॉलर प्रति औंस होते. डिसेंबरमध्ये अमेरिकी सोने वायदा देखील 6.60 डॉलर प्रति औंसने घसरले होते. त्यामुळे 1,459.80 डॉलर प्रति औंस झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी हाजिर 0.31 डॉलरने घसरुण आठवड्यात 16.76 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

Visit : Policenama.com