खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सराफ बाजारात आज सोनं 130 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदी देखील 110 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सणासुदीला सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याने सोने खरेदीत उत्साह पाहायला मिळत आहे.

सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 39,010 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीच्या किंमती देखील 110 रुपयांनी घसरल्या, यामुळे चांदी 46,530 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

मागील आठवड्यात सोने हाजिर 15.95 डॉलरने घसरुन 1,488.65 डॉलर प्रति औंस झाले होते, याचा परिणाम स्थानिक सराफ बाजारात पाहायला मिळाला. सणाच्या दिवसात देशात सोन्याच्या किंमती वाढतात मात्र मागील आठवड्यात झालेल्या घसरणीने सोने स्वस्त झाले आहे.

अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्धावर समाधानकारण परिणाम आल्याने अशी शक्यता आहे की परदेशात डिसेंबर मध्ये अमेरिकन सोने वायदा देखील 16.80 डॉलरने कमी होऊन 1,493.50 डॉलर प्रति औंस झाला. चांदी हाजिर आठवड्याभरात झालेल्या उतार चढावानंतर 17.53 डॉलर प्रति औंस वर बंद झाली.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी