काय सांगता ! होय, भारतातील ‘या’ नदीत वाहतंय ‘सोनं’, ‘सुपा’तून निघतात ‘कण’, ‘रहस्यमयी’ आहे ‘कारण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या भारतात अनेक नद्या आहेत ज्या तेथील तीर्थक्षेत्रांमुळे, मंदिरामुळे ओळखल्या जातात. मात्र एक नदी आहे जी सोन्यासाठी ओळखली जाते. स्वर्णरेखा असे या नद्यांचे नाव आहे. झारखंडमधील रत्नाग्राभा या ठिकाणाहून हि स्वर्णरेखा नावाची नदी वाहते. या नदीच्या वाळूमधून वर्षानुवर्षे सोनं काढलं जात आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात ही नदी वाहते. बंगालमध्ये त्याला सुबर्णरेखा असेही म्हणतात.

इस नदी में बहता है सोना, सूप से न‍िकालते हैं कण, रहस्यमयी है वजह

स्वर्णरेखा नदी रांचीपासून 16 कि.मी. दक्षिण – पश्चिमेकडील नगडी गावात राणी चुआन नावाच्या ठिकाणाहून उगम पावते. झारखंडमधून वाहत ती ओडिशा, पश्चिम बंगाल मार्गे बंगालच्या उपसागरात बालेश्वरच्या नावाच्या ठिकाणी जाते. या नदीची लांबी 474 किमी आहे. स्वर्ण रेखा आणि तिची उपनदी करकरीच्या वाळूत सोन्याचे कण आढळतात. काही लोक म्हणतात की स्वर्ण नदीतील सोन्याचे कण करकरी नदीमधून वाहतात. करकरी नदीची लांबी फक्त 37 किमी आहे. ती एक छोटी नदी आहे. आजपर्यंत हे रहस्य उलगडले गेले नाही कि, या दोन नद्यांमधून सोन्याचे कण नक्की कोठून येतात?

इस नदी में बहता है सोना, सूप से न‍िकालते हैं कण, रहस्यमयी है वजह

झारखंडमध्ये, तमाड़ आणि सारंडा सारख्या ठिकाणी स्थानिक आदिवासी नदीच्या पाण्यात वाळू गाळून सोन्याचे कण गोळा करण्याचे काम करतात. एका महिन्यात एखादी व्यक्ती 60-80 सोन्याचे कण काढू शकते. कणांचा आकार तांदळाच्या दाण्यापेक्षा किंचित मोठा आहे. इथले आदिवासी पावसाळ्याशिवाय इतर वर्षभर हे काम करतात.

इस नदी में बहता है सोना, सूप से न‍िकालते हैं कण, रहस्यमयी है वजह

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सोनभद्रच्या डोंगरावर सोन्याचा एक मोठा साठा सापडला होता. 2012 मध्ये सोनभद्रच्या डोंगरावर सोन्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली गेली होती पण अद्याप या दिशेने काम सुरू झालेले नाही. परंतु आता राज्य सरकारने सोन्याचे ब्लॉक्स वाटप करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. सोनभद्रच्या हरदी भागात 646.15 किलो सोन्याचे साठे सापडले आहेत, तर सोन हिलमध्ये 2943.25 टन सोन्याचा साथ सापडला आहे.

इस नदी में बहता है सोना, सूप से न‍िकालते हैं कण, रहस्यमयी है वजह