‘या’ कारणामुळे सोन्याच्या भावात प्रचंढ वाढ ; सध्या ‘एवढा’ आहे प्रती तोळा भाव

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या किमतीत वाढ झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे वाढ वाढल्याने आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळा इतके वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे. मार्च महिन्यानंतर सोन्याच्या दरात इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत होणाऱ्या या भाववाढीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला असताना एका बाजूला लग्नसराई देखील सुरु आहे, आणि त्यात सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र या सगळ्यात नागरिकांचा सोने खरेदीसाठीचा उत्साह कमी झालेला अजिबात दिसत नाही. मागील आठवड्यात ६९.६२ रुपये असलेला डॉलरचा दर ७०.३५ रुपयांवर पोहचला आहे.

एकीकडे सोन्याचे भाव वाढत असताना चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. अडीच महिन्यात चांदीचे भाव किलोमागे ३ हजार रुपयाने कमी झाले आहेत. किलोमागे चांदीचा भाव सध्या ३९००० हजार रुपये आहे. यासंदर्भात जळगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी बोलताना सांगितले कि, रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले. लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने देखील सोन्याचे भाव वाढत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like