Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या स्थानिक वायदा बाजारातील किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचा भाव 506 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,020 रुपयांवर आला. याशिवाय फेब्रुवारी वायदा बाजारात सोन्याच्या भावात सध्या 1.27 टक्के म्हणजेच 646 रुपयांची घट होऊन प्रति 10 ग्रॅम 50,203 रुपये ट्रेंड करत असल्याचं दिसून आलं. बुधवारी सकाळी जागतिक वायदा किंमतीत घसरण दिसून आली.

बुधवारी सोन्यासोबतच चांदीच्या स्थानिक वायदा भावातही घट दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजच्या डिसेंबर वायदा बाजारात चांदीचा भाव बुधवारी सकाळी 10 वाजून 27 मिनिटांनी 1.66 टक्के म्हणजेच 1007 रुपयांची घट होऊन प्रति किलो 59,564 रुपये ट्रेंड करत होता. तसंच जागतिक पातळीवर चांदीच्या वायदा किंमतीत सुद्धा घसरण दिसून आली.

जागतिक स्तरावर सोन्याचे भाव
ब्लूमबर्गच्या मते बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील भाव 1.14 टक्क्यांनी म्हणजेच 21.80 डॉलरनं घसरून 1887 डॉलर प्रित औंसवर ट्रेंड करताना दिसून आले. याशिवाय सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 0.28 टक्के म्हणजेच 5.17 डॉलरची घट होऊन 1883.35 डॉलर प्रति औंसरवर ट्रेंड करताना दिसून आला.

जागतिक स्तरावरील चांदीचे दर
ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक वायदा भाव 1.63 टक्क्यांनी म्हणजेच 0.39 डॉलरची घट होऊन 23.52 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसला. त्याचसोबत चांदीच्या जागतिक स्पॉट बाजारातील भावात 1.67 टक्के म्हणजेच 0.39 डॉलरची वाढ होऊन 23.45 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसला.