Gold Futures Price : सोन्याच्या किंमतीत मोठी ‘घसरण’, चांदी देखील ‘घट’, जाणून घ्या दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी सोन्या-चांदीच्या वायदा किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट रोजी 2020 च्या सोन्याचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी 0.69 टक्क्यांनी म्हणजेच 321 रुपयांनी घसरून 46,375 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत होता. त्याचबरोबर 5 ऑक्टोबर 2020 चा सोन्याचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी 0.69 टक्के म्हणजेच 322 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,492 रुपयांवर होते. विशेष म्हणजे गुरुवारी दिल्लीत सोन्याची स्पॉट किंमत प्रति 10 ग्रॅम 47,185 रुपये होती. शुक्रवारी सकाळी सोन्याच्या ग्लोबल स्पॉट आणि फ्युचर्सच्या किंमतीही घसरण दिसून आली.

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, एमसीएक्सवर 3 जुलै 2020 रोजी चांदीचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी 0.88 टक्के म्हणजेच 428 रुपयांनी घसरणीसह 48,383 रुपये प्रतिकिलो वर ट्रेंड करत होता. विशेष म्हणजे, गुरुवारी दिल्लीत चांदीची किंमत 542 रुपये प्रति किलोग्रॅमच्या घसरणीसह 49,558 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील शुक्रवारी सकाळी सोन्याच्या वायदा आणि स्पॉटच्या किंमतीत घसरन दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा जागतिक वायदा भाव 0.62 टक्के म्हणजेच 10.70 डॉलरच्या घसरणीसह 1716.70 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत 0.22 टक्के म्हणजेच 3.85 डॉलरच्या घसरणीसह 1,710.16 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. जागतिक पातळीवर शुक्रवारी सकाळी चांदीचा वायदा भाव 0.53 टक्के म्हणजेच 0.10 डॉलरच्या घसरणीसह 17.97 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. त्याचवेळी चांदीची जागतिक पातळीवर शक्रवारी सकाळी 0.05 टक्के म्हणेजच 0.01 डॉलरच्या वाढीसह 17.72 डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता.