सोन्या-चांदीच्या दरात ‘तेजी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या वायदा भावात शुक्रवारी वाढ झाली असून एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी सकाळी ५ जून २०२० ला सोन्याचा वायदा भाव १.३५ टक्के किंवा ५८४ रुपयासह ४३,८२४ रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० ला सोन्याचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी एमसीएक्सवर १.४१ टक्के किंवा ६१२ रुपयासह ४३,९७७ रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता. तर ३ एप्रिल २०२० च्या सोन्याचा वायदा भाव एमसीएक्सवर शुक्रवारी सकाळी १.९४ टक्के किंवा ८४३ रुपयासह ४४,२०० रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता.

सोन्यासह चांदीच्याही वायदा भावात शुक्रवारी सकाळी तेजी पाहायला मिळाली होती. एमसीएक्सवर ५ मे २०२० चा चांदीचा वायदा भाव यावेळी ३.०४ टक्के किंवा १२१२ रुपयाच्या तेजीसह ४१,०८४ रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता.

जागतिक बाजारपेठेत तर शुक्रवारी सकाळी सोन्याच्या किंमतीत घट नोंदवली गेली आहे. ब्लूमबर्गनुसार, शुक्रवारी सकाळी जागतिक स्तरावर सोन्याचा हाजीर भाव ०.०४ टक्के किंवा ०.६६ डॉलरने घसरून १,६१३.३३ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. सोन्यासारखेच चांदीच्या जागतिक हाजीर भावातही शुक्रवारी सकाळी घट पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर चांदीचा हाजीर भाव शुक्रवारी सकाळी ०.३८ टक्के किंवा ०.०६ डॉलरने घसरून १४.४३ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू असून यामुळे देशात केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांना सोडून सगळी औद्योगिक आणि व्यावसायिक कामे ठप्प झाली आहेत. लॉकडाऊनमुळे शुक्रवारी देशातील सोन्याचे हाजीर मार्केटही बंद राहील.