Gold Rate Today : सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या किंमतीत घट नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत घसरल्याने तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला. अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे गुंतवणुकदारांना सोने हा सुरक्षित आणि सकारात्मक पर्याय वाटत आहे.

सोन्याच्या दरात 0.19 टक्के घट नोंदली गेल्याने सोन्या दर प्रति 10 ग्रॅम 49166 रुपये झाला आहे. मागील सत्रात हा दर 49259 रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळी सोने 49288 रुपयांवर उघडले होते. तर चांदीमध्ये 0.65 टक्क्यांची वाढ झाल्याने प्रति किलोचा दर 52990 रुपये झाला आहे. काल चांदीचा भाव 52649 रुपये होता. आज बाजार सुरु होताना तो 52840 रुपयांवर आला होता.

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1800 डॉलरवर गेली. कोरोना व्हायरस प्रकोप आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे सध्या सोने हा सुरक्षित पर्याय असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. मात्र, आज सोन्याच्या दरात येथे घट नोंदली गेली. स्पॉट गोल्ड 0.1 टक्के वाढून 1808.85 डॉलर झाले आहे. मात्र, अमेरिकेमध्ये गोल्ड फ्यूचर्स 0.2 टक्के घटून 1808.90 डॉलरवर आले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला
आज भारतीय रुपया 75.28 प्रति डॉलर वर पोहोचला. शेअर बाजारात प्रारंभी तेजी दिसून आली. काल मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये घट झाली होती. सोने 114 रुपये स्वस्त झाले. तर चांदीमध्ये 140 रुपयांची घट झाली होती. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 49996 होता. सोमवारी हा दर 50110 होता. तर मंगळवारी चांदीचा भाव प्रति किलो 53,427 रूपये होता. सोमवारी हा भाव 53,567 रुपये होता.