Gold बाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेईल : पीयूष गोयल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगांसंबंधी शुल्क आणि करांबाबत देण्यात आलेल्या सूचनांवर वित्त मंत्रालयाकडून विचार करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून गुरुवारी देण्यात आली. रत्न आणि दागिने निर्यात जाहिरात परिषदचे अध्यक्ष कोलिन शाह यांच्याकडून सोन्यावरील आयात शुल्क 12.5 टक्क्यांनी कमी करून 4.5 टक्के आणि हिऱ्यावर 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्याचं सुचवण्यात आले आहे. कोलिन शाह यांनी उद्योग मंडळाच्या सीआयआयच्या रत्न आणि दागिने संमेलनाला संबोधित करताना या शुल्कातील कमीबाबत ज्या सूचना देण्यात आल्या. त्यावर अर्थ मंत्रालय विचार करत असल्याचं पीयूष गोयल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

या क्षेत्राबद्दल वित्तीय संस्थांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे
या उद्योगात अनियमितता आढळून येत आहे. ज्याचा परिणाम विश्वासार्हतेवर आणि विशेषत: आर्थिक बाबींवर झाला आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. या क्षेत्राच्या वित्तीय संस्थांमध्ये विश्वास निर्माण करणारी स्थिती तयार करण्यासाठी हा उद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असेदेखील पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. बँका आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत काम करून आज उद्योगास भेडसावणाऱ्या अर्थसह्याची समस्या सोडवता येऊ शकते.

उद्योगात सुव्यवस्थित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी, उद्योगाने स्व-नियमन, धोरण आणि कार्यपद्धतींचा विचार केला पाहिजे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. कोलिन शाह यांच्याकडून दागिन्यांची निर्यात, निर्यातीवेळी सीमा शुल्क स्थानकांवर कर परतावा, ई-कॉमर्स आणि कुरियरद्वारे छोट्या पॅकेटमध्ये निर्यातीची परवानगी यांसारखे मुद्दे वेळोवेळी समोर आणण्यात आले, असेदेखील गोयल म्हणाले. या सर्व बाबींवर विचार केला जाणार असल्याचे गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

You might also like