… म्हणून Gold Imports मध्ये प्रचंड मोठी ‘घसरण’, साडे सहा वर्षातील ‘निच्चांकी’वर आलं सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सोन्याच्या आयातीमध्ये प्रचंड घट झाली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये देशाच्या सोन्याच्या आयातीमध्ये वार्षिक तुलनेत 73 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा प्रकारे मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात साडेसहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. देशातील सोन्याच्या आयातीतील ही घसरण देशांतर्गत किमती वाढल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे औद्योगिक उपक्रम बंद पडल्यामुळे झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सरकारी सूत्रांद्वारे ही माहिती दिली गेली आहे.

देशात 25 मार्चपासून 21 दिवस लॉकडाऊन लागू आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमुळे सोन्याची किरकोळ मागणी पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे सोन्याची आयात घटली आहे.

भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्याचा मोठा ग्राहक आहे. मार्च महिन्यात देशात केवळ 25 टन सोन्याची आयात झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत हे 93.24 टक्के कमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये आयात सुमारे 63 टक्क्यांनी घसरून 1.22 अब्ज डॉलरवर गेली आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या देशभरात सोन्याचे स्पॉट मार्केट बंद आहेत. त्याचबरोबर महावीर जयंतीच्या निमित्ताने सोमवारी सोने-चांदीच्या वायदे बाजारही बंद आहे. जागतिक स्तराबद्दल बोलायचे म्हणले तर, ब्लूमबर्गच्या मते, सोमवारी दुपारी सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत 0.98 टक्क्यांनी किंवा 15.81 डॉलर ते 1,636.62 डॉलर प्रति औंस झाली होती.