‘सोने’ महागले तर ‘चांदी’ घसरली ; जाणून घ्या ‘भाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नसराई संपत आली असली तरी सोन्याचे भाव अद्याप वाढतच आहेत. सोन्याचे भाव जरी वाढले असले तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात २२५ रुपयांनी घसरण झाली आहे.

ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राजधानी दिल्लीत सोने १५० रुपयांनी वाढून ३३,०२० रुपये प्रति १द ग्रॅम झाले. चांदी मात्र २२५ रुपयांनी घसरून ३७,३२५ रुपये किलो झाली. जागतिक बाजारात मात्र बाजारभाव तेजीत राहिला.  न्यूयॉर्क येथे सोन्याचे दर वाढून १,२८४,४० डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचेही दर वाढून १४. ४७ डॉलर प्रतिऔंस झाली.

‘या’ कारणामुळे झाले दरबदल –

ज्वेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे सोन्याला फटका बसला, तर औद्योगिक क्षेत्रातील मागणी घटल्यामुळे चांदी उतरली.