बंद फ्लॅटवर चोरांंनी मारला डल्ला ; २७ तोळे दागिने केले लंपास

कोल्‍हापूर : प्रतिनिधी – घरफोडीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अनेकदा घरी कोणी नसताना घरावर चोरांकडून डल्ला मारला जातो आणि सारा मुद्देमाल लंपास केला जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २७ तोळे दागिन्यांवर डल्ला मारत ते लंपास केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात फर्याद नोंदवण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील शिरोली टोलनाका नजीकची ही घटना आहे. टोलनाक्याजवळच असणाऱ्या चैतन्य अपार्टमेंटमध्ये चोरांनी आपला हात साफ केला. चोरांनी बंद फ्लॅट फोडून डल्ला मारला. चोरट्यांनी २७  तोळे दागिने लंपास केले. सोमवारी रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.  चोरट्यांनी पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्रे, सोन्याचे तुकडे असा २७ तोळ्यांचा ऐवज चोरून नेला. याबाबत वैशाली भोसले यांनी फिर्याद देताना माहिती दिल्याचे समजत आहे. या घटनेने कुटुंबियांना धक्काचा बसला आहे.