खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक स्तरावर दोन्ही मौल्यवान धातूंचे दर कमी झाले आहेत. शनिवारी सणासुदीच्या दरम्यान दिल्ली सराफ बाजारात सोने 430 रुपयांना स्वस्त झाले. यामुळे उच्चांकी गाठलेल्या सोन्याचा दर कमी झाला. आज सोने 430 रुपयांनी स्वस्त होऊन 39,140 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.

चकाकलेल्या चांदीच्या भावात देखील आज घसरण पाहायला मिळाली. आज चांदी 360 रुपयांनी स्वस्त झाली. यामुळे चांदी 46,640 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. सणासुदीला सोने चांदी स्वस्त झाल्याने सराफ बाजारात मोठ्या प्रमाण सोन्याची खरेदी होणार आहे.

महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. परंतू आज अचानक दोन्ही धातूंचे दर कमी झाल्याने सामान्यांना आज दिलासा मिळाला.

लंडनमध्ये न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोने हाजिर 12.70 डॉलरने कमी होऊन 1,482.10 डॉलर प्रति औंस झाले. तर चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला मिळाली, चांदीची 17.53 डॉलर प्रति औंसने विक्री झाली.

 

Visit : Policenama.com

You might also like