Gold Man Datta Fuge Murder Case | ‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे खून प्रकरणातील आणखी दोन मारेकर्‍यांना पोलिसांनी पकडलं, प्रचंड खळबळ

दि. 15 जुलै 2016 रोजी दिघी परिसरात 'गोल्डमॅन' दत्ता फुगेंची (Gold Man Datta Fuge) दगडाने ठेचून झाली होती हत्या (Murder)

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) आठवडयाभरापुर्वीच गोल्डमॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांच्या मारेकर्‍याला अटक (Arrest) केली होती. आता पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सोन्याच्या शर्टमुळं (Gold Shirt) परिसरात प्रसिध्द असलेल्या गोल्डमॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांची दि. 15 जुलै 2016 रोजी दिघी परिसरातील (Dighi Area) भारत माता नगर येथे दगडाने ठेचून हत्या (Murder) झाल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

तुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे?

यापुर्वी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी फुगे यांच्या हत्याप्रकरणी प्रमोद उर्फ क्का धौलपुरी याला अटक  केली होती.
तो भोसरी आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता.
पोलिसांनी त्याच्याबद्दल माहिती मिळाली असून सापळा रचून पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या.
आता पोलिसांनी प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी याचे साथीदार प्रसन्ना पवार आणि अंकुश डांगले यांना अटक केली आहेत.
त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
त्यामध्ये देशी पिस्तुलासह काडतुसांचा समावेश आहे.

Demand of Bribe | 25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

‘गोल्डमॅन’ म्हणून दत्ता फुगे प्रसिध्द होते

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी फुगे यांच्या मारेकर्‍यांना अटक केल्यानंतर गोल्डमॅन दत्ता फुगे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सोन्याच्या हौसे पोटी फुगे यांनी सुमारे 3 किलो वजनाचा सोन्याचा शर्ट (Gold shirt) बनवून घेतला होता.
त्यामुळे त्याच्याबद्दल मोठी चर्चा झाली होती.
एवढेच नव्हे तर त्यांचं नाव राज्यभर गाजलं देखील होतं.
दत्ता फुगे हे फुगे वक्रतुंड नावाने चिटफंड देखील चालवत होते.
त्याच काळात त्यांचे अनेक शत्रु देखील निर्माण झाले. 15 जुलै 2016 रोजी दिघी परिसरात त्यांची हत्या झाली होती.

SSC Result | इयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार

Web Title : Gold Man Datta Fuge Murder Case pimpri chinchawad police arrested two more accused in gold man datta fuge murder case