‘गोल्ड मेडलिस्ट’ आहे ‘महाभारत’मधील ‘गांधारी’ रेणुका इसरानी, 22 व्या वर्षी केली ‘कमाल’

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या रामायण आणि महाभारत या जुन्या मालिका सर्वाधिक टीआरपी घेताना दिसत आहेत. अशात आता या मालिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांबद्दल अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. आज आपण महाभारत या मालिकेतील गांधारी म्हणजेच रेणुका इसरानी बद्दल जाणून घेणार आहोत.

महाभारत या मालिकेत काम करताना रेणुका फक्त 22 वर्षांची होती. त्यावेळी ती स्वत:ला अ‍ॅक्ट्रेस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तिला यश महाभारतमधूनच मिळालं. डोळ्यांवर पट्टी बांधूनही रेणुका गांधारीचे हावभाव चेहऱ्यावर उत्तमरित्या दाखवते यावरून ती किती कमालची अ‍ॅक्ट्रेस आहे हे सिद्ध होतं. गांधारीची भूमिका तिनं पहिल्यांदाच साकारली होती असं अजिबात नाहीये. याआधीही तिनं मणिपुरी स्टाईलमध्ये अंधाधुन नावाचा प्ले केला होता. यात तिनं गांधारीची भूमिका साकारली होती.

गोल्ड मेडलिस्ट आहे रेणुका

रेणुका इसरानी राजस्थानची आहे. तिनं जयपूरच्या महाराणी कॉलेमधून शिक्षण घेतलं आहे. कॉलेजच्या दिवसात ती ऑलराऊंडर गोल्ड मेडलिस्ट राहिली आहे. दिल्लीत तिनं खूप काळ थिएटर केलं. तिनं अनेक अवॉर्ड्सही जिंकले आहेत.

22 व्या वर्षी तिनं महाभारतमध्ये काम केल्याचा खुलासा तिनंच केला आहे. यानंतर तिला साक्षी तंवर सोबत बडे अच्छे लगते है या टीव्ही शोमध्ये काम मिळालं. यानंतर तिला काही मोठे शोज मिळाले नाहीत. तिची सुरुवात चांगली होती परंतु तिला खास जागा काही बनवता आली नाही.

https://www.instagram.com/p/BD4-39JkCo2/