Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Mines In Maharashtra | भारतीयांचे सोन्यावरचे प्रेम जग जाहीर आहे. पण, सोन्याचे महत्त्व घरातील आभूषणांपर्यंत मर्यादित नसून त्याला आर्थिक महत्त्वही आहे. जगात एखाद्या देशाच्या चलनाची किंमत त्या देशात असलेल्या सोन्यावर अवलंबून असते. चलनाची किंमत ठरवणे ते एकमेव एकक नाही, त्यात इतर गोष्टींचाही समावेश होतोच, पण सोने त्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे असते. त्यामुळे एखाद्या देशाकडे सोन्याचा नैसर्गिक स्रोत असणे, अतिशय फायदेशीर ठरते, भारतात सोन्याच्या जास्त खाणी नाहीत, एकूण फक्त तीन आहेत. त्यातील एक खाण कोल्लार येथे होती आणि तिच्यावर केजीएफ सिनेमा तयार झाला. पण आता त्यात अजून दोन ठिकाणांची भर झाली आहे. (Gold Mines In Maharashtra)

आता महाराष्ट्राच्या भूगर्भात सोने असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक खनिजं सापडतात. त्यात कोळसा, बॉक्साइट, आयर्न यांसारख्या २४ खनिजांचा समावेश होतो.

पण आता या मातीत सोनेही दडले असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागातील भूगर्भात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) (Gold Mines In Maharashtra) आढळून आल्या आहेत.
या भागातील भूगर्भात तांबेही असून, सोनेही मोठ्या प्रमाणात मिळू शकते, असा अंदाज केंद्र सरकारच्या खनिजकर्म विभागाने वर्तविला आहे. तसेच, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीने खनिजकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहितीही समोर आली आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता.

‘राज्यात खनिजकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात
वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. केंद्रीय खनिजकर्म मंत्री प्रल्हाद जोशी,
केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिजकर्म मंत्री दादाजी भुसे,
केंद्रीय खनिजकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना आदी या परिषदेला उपस्थित होते.

Web Title :- Gold Mines In Maharashtra | gold mines in chandrapur sindhudurga the chief minister also gave an explanation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

Sidhu MooseWala Murder Case | सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात