Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

नवी दिल्ली : Gold Mutual Fund | जेव्हापासून सोन्यात इतर पर्याय आले आहेत, सामान्य माणूस सुद्धा सोन्यात गुंतवणुक करू लागला आहे. गोल्ड बाँड (Gold Bond), गोल्ड ईटीएफ (Gold ETF) आणि गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund) द्वारे सोन्यात गुंतवणुक केली जाऊ शकते. गोल्ड म्युच्युअल फंड चांगल्या रिटर्नची सुरक्षित पद्धत आहे. येथे गुंतवणुक केल्याने फिजिकल गोल्डप्रमाणे ते बाळगण्याची चिंता नसते. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत, ज्यांनी एफडीच्या तुलनेत जास्त रिटर्न दिला आहे.

500 रुपयात खरेदी करू शकता सोने

म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही यामध्ये 500 रुपयांचे सुद्धा सोने खरेदी करू शकता. तुम्ही दर महिना SIP च्या माध्यमातून गोल्डमध्ये गुंतवणूक (Gold Mutual Fund) करू शकता. यामध्ये कोणत्याही दुसर्‍या म्युच्युअल फंड प्रमाणे गुंतवणुक करता येते.

अ‍ॅक्सिस गोल्ड फंड (Axis Gold Fund), कोटक गोल्ड फंड (Kotak Gold Fund), एसबीआय गोल्ड फंड (SBI Gold Fund) आणि एचडीएफसी गोल्ड फंड (HDFC Gold Fund) हे काही असे गोल्ड फंड आहेत जे चांगला रिटर्न देत आहेत.

कोटक गोल्ड फंड (Kotak Gold Fund)

म्युच्युअल फंडच्या अशा स्कीममध्ये कोटक वर्ल्ड गोल्ड फंड एक इंटरनॅशनल फंड आहे,
जो गोल्ड मायनिंग कंपन्या आणि त्यांची मार्केटिंग करणार्‍या फर्ममध्ये गुंतवणुक करतो.
या योजनांचा रिटर्न सोन्याच्या दैनिक वाटचालीशी संबंधीत असतो.
यासाठी या स्कीममध्ये पैसे लावण्यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) किंवा सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान (STP) चा वापर केला पाहिजे.

गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund) एक ओपन-एंडेड प्रॉडक्ट असते जे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते.
अनेक असे गोल्ड फंड आहेत, ज्यांनी अवघ्या 3 वर्षात 14 ते 15 टक्कपर्यंत रिटर्न दिला आहे.

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात 8 लाखाच्या लाच प्रकरणी जात पडताळणी समितीचा उपायुक्त नितीन ढगे ‘लाच लुचपत’च्या जाळयात; प्रचंड खळबळ

PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Mutual Fund | best gold mutual funds gold investment plan gold etf bond and gold price today in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update