Gold Rates | सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ होणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सोन्याच्या Gold दरात घट झाली. पण मार्च २०२१ पासून पुन्हा एकदा सोन्याच्या दरात Gold सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या ३१ मे रोजी सोन्याची किंमत ही १९०७.५९ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली होती. ही किंमत १० महिन्यातील उच्चांकी दर होता. यंदाच्या वर्षात पाहायचं झालं तर सोन्याच्या किमती ५० हजारापर्यंत आल्या आहेत. एप्रिल महिन्यात सोनं हे ३ ते ४ हजारांनी महागलं आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार २०२१ च्या अखेरीस जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमतीत प्रतिऔंस २०६३ डॉलरपर्यंत पोहोचू शकते. कोरोना काळात देशात गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमतींमध्ये नवीन विक्रम नोंदवला गेला होता. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर सोन्याची Gold किंमत हळहळू कमी झाल्या होत्या.

दरम्यान, बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या (BoFA माहितीनुसार, कोरोना काळात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढत आहे.
त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किंमतीतील वाढ अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. BoFA नं वर्तवलेल्या अंदाजानुसार पाहायचं झाल्यास भारतात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ५३ हजारापर्यंत जाऊ शकते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ भारतालाच नव्हे,
तर जागतिक बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे सोन्याच्या दरात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुंतवणुक मार्गदर्शकांच्या म्हणण्यानुसार सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच मोठी नामी संधी आहे. कारण येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.
डिसेंबरपर्यंत सोन्याची प्रति १० ग्रॅमची किंमत ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष ( रिसर्च) अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार देशात दिवाळी सणापर्यंत सोन्याचा भाव ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे लाँग टर्म गुंतवणुकीसाठी सोन्यात गुंतवणूक करणं चांगला पर्याय ठरू शकतो. देशात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅमसाठी ४७ हजार १२० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅमसाठी ५१ हजार २७० रुपये इतका आहे. एप्रिल महिन्याचा अंदाज लावायचा झाला तर भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात ही किंमत आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या