पुण्याच्या अवंतिकाचा अटकेपार झेंडा !!! आशियाई अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

हाँगकाँग : वृत्तसंस्था – हाँगकाँग येथे सध्या युवा आशियाई अजिंक्य स्पर्धा सुरु आहेत. त्यातील १०० मिटरच्या शर्यतीत भारताच्या अवंतिका नराळेने सुवर्णाची कमाई केली आहे. अवंतिकानं ही सुवर्ण कामगिरी करत महाराष्ट्राचा मान उंचवला आहे.

१०० मिटर शर्यतीत अवंतिकाने ११.९७ सेकंदात अंतर पाक केले. सुवर्णावर नाव कोरलं आणि भारताला सुवर्ण मिळवून दिलं. अवंतिका ही पुण्याची आहे. त्यामुळे तिच्या या कामगिरीवर पुण्यासह पुर्ण महाराष्ट्राला आभिमान वाटत असावा.

गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही अवंतिकांने सुवर्ण कामगिरी करत सुवर्णावर नाव कोरलं होते. तेव्हा अवंतिकांने १०० मिटरचे अंतर १२.३६ सेकंदात पार केले होते. त्यानंतर अवंतिकाने तिच्या खेळावर चांगली मेहनत करत वेळ करत बरिच सुधारणा केली.

दरम्यान, अवंतिकाचा पहिला आवडाता खेळ हा ॲथलेटिक्स नव्हतेच. अवंतिका पूर्वी कबड्डीपटू होती. तेव्हा तिच्यातील चपळता आणि गती पाहता तिचे प्रशिक्षक शिवाजी मेहता यांनी तिला ॲथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिनं ॲथलेटिक्सकडे वळण्याचा निर्णय अवंतिकाने घेतला. अवंतिका इयत्ता आठवीत असल्यापासून ॲथलेटिक्सचा सराव करत आहे. त्यामुळे अवंतिका तिच्या पुढील वाटचालीत मोठी कामगिरी कऱण्याची अपेक्षा बाळगून प्रयत्न करत आहे.