Gold Rate : आठवड्याभरात सोन्यामध्ये कमालीची ‘तेजी’, चांदीच्या दरात ‘चढ-उतार’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात अर्थव्यवस्था बाजारात प्रचंड चढ-उतार दिसत आहे आणि सराफा बाजारही यापासून अलिप्त नाहीये. या आठवड्यात Gold Price आणि Silver Rate मध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स एसोसिएशनच्या आकड्यांनुसार मागच्या आठवड्यात शुक्रवारी २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ४१,८४९ रुपये प्रति १० ग्रामवर होता, जो या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात ३९,८३५ रु. प्रति १० ग्रामवर आला आहे. आठवड्याच्या पाचव्या सत्रात शुक्रवारी सोन्याचा भाव वाढत पुन्हा ४१,१६९ रु. प्रति १० ग्रामवर पोहोचला आहे. याप्रकारे सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात १,३३४ रु. ची वाढ नोंदवली गेली आहे.

अशाप्रकारे नोंदवला गेला आहे सोन्याच्या किंमतीत चढ-उतार
१३ मार्च – मागच्या आठवड्यात शेवटच्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव ४१,८४९ रु. प्रति १० ग्रामवर होता.
६ मार्च – या आठवड्याच्या पहिल्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा भाव घसरून ३९,८३५ रु. प्रति १० वर राहिला.
१७ मार्च – सोने १०९ रु. ने स्वस्त होऊन ३९,७२६ रु. प्रति १० ग्रामवर आले.
१८ मार्च – या दिवशी सोन्याची किंमत ६४९ रु. ने वाढत ४०,३७५ रु. स्तरावर पोहोचली.
१९ मार्च – सोन्याचा भाव या दिवशी किरकोळ ४१ रु. ने घसरत ४०,३३४ रु. प्रति १० ग्राम राहिला.
२० मार्च – सोन्याचा भाव शुक्रवारी ८३५ रु. ने वाढत ४१,१६९ रु. प्रति १० ग्रामवर पोहोचला.

चांदीमध्ये असे झाले चढ-उतार
१६ मार्च – चांदीची किंमत या आठवड्याच्या पहिल्या सत्रात ३६,६४० रु. प्रति किलोग्राम राहिली.
१७ मार्च – चांदी १,४९५ रु. च्या मोठया प्रमाणात घसरत ३५,१४५ रु. प्रति किलोग्रामवर आली.
१८ मार्च – आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात किरकोळ किंमतीने वाढत चांदीचा भाव ३५,५१५ रु. प्रति किलोग्रामवर पोहोचला.
१९ मार्च – चांदी ठीक-ठाक भावाने घसरत ३५,२२० रु. प्रति किलोग्राम झाली.
२० मार्च – चांदी १,९२० रु. ने मोठ्या प्रमाणात वाढत ३७,१४० रु. प्रति किलोग्रामवर पोहोचली.