सरकार घेऊन आलंय सर्वसामान्यांसाठी सुवर्णसंधी ! Gold 10 हजारांपर्यंत झालंय स्वस्त, 1 मार्चपासून करा खरेदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सध्या सोन्याचे दर हे आपल्या ऑल टाईम हाय किंमतीपेक्षा जवळपास १० हजार रूपयांनी स्वस्त झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी ४,६६२ रूपयांचं मूल्य निश्चित केलं आहे. जर तुम्हाला सर्राफा बाजारापेक्षा कमी किंमतीत सोनं खरेदी करायचं आहे तर मार्च महिन्यात तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकार सामान्यांना यासाठी एक संधी देत आहे. १ मार्चपासून सरकारनं सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री करण्याचा निर्णय घेतलला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, सरकारनं रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करून आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यावर गुंतवणूकदारांना प्रति ग्राम ५० रूपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच या बॉन्डचं मूल्य ४६,६२० रूपये प्रति १० ग्राम असेल. केंद्र सरकारनं अशावेळी हा बॉन्ड आणला आहे जेव्हा सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठल्यानंतर त्यात १० हजार रूपये प्रति १० ग्रामची घसरण झाली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२०-२१ च्या १२ व्या टप्प्यातील सबस्क्रिप्शन ५ मार्च २०२१ नंतर बंद होईल. गोल्ड बॉन्डसाठी सरकारनं ४६६२ रूपये प्रति ग्रामचा दर निश्चित केला आहे. गोल्ड बॉन्डसाठी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडद्वारे ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या प्रकाशित सरासरी बंद होणाऱ्या किंमतीवर आधारित आहे.

गुंतवणूकदारांना यासोबत सोन्याच्या दराचा फायदा तर मिळतोच. याव्यतिरिक्त त्यांना या गुंतवणूकीवर २.५ टक्क्यांचा फिक्स्ड इंटरेस्टही मिळतो.

या बॉन्डचा कालावधी ८ वर्षांचा असतो. तसंच ५ वर्षांनंतर तुम्ही प्रीमॅच्युअर विड्रॉव्हल करू शकता. तीन वर्षांनंकर लाँग टर्न कॅपिटल गेन टॅक्स लागेल. परंतु मॅच्युरिटीपर्यंत ठेवल्या कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही. तर याचा लोन घेण्यासाठीही वापर करता येऊ शकतो. सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे सॉवरेन बॉन्ड जारी केले जातात. २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्डची योजना सुरू करण्यात आली होती. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये एखादी व्यक्ती आर्थिक वर्षात जास्तीतजास्त ५०० ग्राम सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकते.

कमीतकमी गुंतवणूक ही १ ग्रामची असणं आवश्यक आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये आता तुम्ही ५ मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता. बाँड जारी केल्याच्या पंधरवड्यात स्टॉक एक्सचेंजमध्ये तरलतेच्या अधीन असतात. प्रत्येक गुंतवणूकीसोबत पॅन क्रमांक आवश्यक आहे. गोल्ड बॉन्डची विक्री बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसईच्या माध्यमातून केली जाते.