खुशखबर ! धनत्रयोदशीच्या आधी सोने ‘स्वस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून कमी झालेल्या सोन्याच्या दरामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदीसाठी लगबग दिसून येत असून दसऱ्यानंतर आता पुन्हा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी लगबग सुरु केली आहे. सोन्याच्या दरात काल 30 रुपयांची किरकोळ घट झाल्याचे पाहायला मिळाले.

सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. त्यामुळे धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडवा या दोन दिवशी देखील सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळणार आहे. सध्या सोन्याचा दर हा 38955 रुपये प्रतितोळा असून काल यामध्ये 30 रुपयांची घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याला नागरिकांकडून सर्वात जास्त मागणी असून त्याच्या खरेदीकडे नागरिकांचा मोठा कल असतो.

चांदीच्या दरात वाढ –
एकाबाजूला सोन्याच्या दरात घसरण होत असताना चांदीचे दर मात्र वाढताना दिसून येत आहेत. चांदीच्या दरामध्ये 150 रुपयांची वाढ झाली असून सध्या चांदीचा दर 46750 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.

Visit : Policenama.com