खुशखबर ! सलग चौथ्या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर बाजारात प्रचंड पडझड झाल्याने गुंतवणूकदारांना पोळले असताना ग्राहकांना मात्र सोने – चांदीने दिलासा दिला आहे. आज (शुक्रवार) कमॉडिटी बाजारात सोने दरात 0. 17 टक्क्यांनी घट झाली. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 42 हजार 314 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली. सराफ बाजारात मात्र सोने 41 रुपयांनी महागले असून सराफ बाजारातील 10 ग्रॅम सोन्याचा दर 42 हजार 354 रुपये होता.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोने 42 हजार 314 रुपये होते. सोमवारी सोन्याचा भाव 43 हजार 788 रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सोन्याचे भाव कोसळले. आज सलग चौथ्या सत्रात कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. चार दिवसांत सोने 1500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीच्या भावात देखील 11000 रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव 2 टक्क्यांनी कमी झाला आणि तो 45 हजार 527 रुपांवर बंद झाला.

कोरोना आणि मंदीच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात मात्र सोन्यातील तेजी कायम आहे. आज सोन्याचा भाव 0. 2 टक्क्यांनी वधारून 1645. 79 डॉलर्स प्रती औंसवर जाऊन पोहचला. एकिकडे जगभरातील भांडवली बाजारामध्ये मोठी घसरण होत असताना सोने – चांदीचे भाव वधारले. चांदीचा भाव 0. 6 टक्क्यांनी वधारून 17. 81 डॉलरवर गेला. मुंबई सराफ बाजारात आज 23 कॅरेट सोन्याचा बाव प्रति 10 ग्रॅम 42 हजार 354 रुपये होता. काल तो 42 हजार 313 रुपयांवर बंद झाला होता.

You might also like