Gold Price Today : आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या नवीन किंमत
पोलीसनामा ऑनलाईन : आज सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. 14 ऑक्टोबर रोजी देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 530 रुपयांनी स्वस्त झाली आणि 50,617 रुपयांवर उघडली. त्याचबरोबर चांदीचा भाव 1,874 रुपयांनी घसरला. चांदीची स्पॉट किंमत 60,314 रुपयांवर उघडली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार 14 ऑक्टोबर 2020 रोजी, देशभरातील सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमती खालीलप्रमाणे आहेत…
धातू 14 ऑक्टोबरचा दर 13 ऑक्टोबरचा अंतिम दर दरात बदल
(23 कॅरेट) 50414 50942 -528
(22 कॅरेट) 46365 46851 -486
(18 कॅरेट) 37963 38360 -397
चांदी 999 60314 Rs/Kg 62188 Rs/Kg -1,874
IBJA मध्ये दर देशभरात सर्वसामान्य :
दरम्यान IBJA जरी केलेला दर सर्वत्र सर्वसामान्य आहे. मात्र, या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोन्याची खरेदी व विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, IBJA देशभरातील 14 केंद्रांकडून सोने आणि चांदीचे सध्याचे दर गोळा करते आणि सरासरी किंमत देते. सोने-चांदीचा सध्याचा दर किंवा स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकते, परंतु त्यांच्या किंमतींमध्ये थोडा फरक आहे.