Gold Price | सोनं मिळतंय 11000 रुपयांनी ‘स्वस्त’, पुन्हा कमाईची संधी; जाणून घ्या 2021 अखेरपर्यंत किती होणार दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price | गुंतवणुकदारांकडून जोरदार झालेल्या खरेदीमुळे ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर सर्वाच्च स्तरावर पोहचला होता. मात्र, जसजशा कोरोना व्हॅक्सीनेशनसोबत आर्थिक हालचाली वाढत आहेत, तसतशी देशात आणि परदेशात सोन्याच्या किमतीत उलथा-पालथ (Gold Price) सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर 2021 म्हणजे मागील शुक्रवारी सोन्याच्या किमतीत 1,130 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण दिसून आली. तर चांदीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाली आणि ती 708 रुपयांच्या घसरणीसह 60,183 रुपये प्रति किग्रॅवर पोहचली. 2021 च्या अखेरपर्यंत सोन्या किमतींचा (Gold Price) कल कसा असेल ते जाणून घेवूयात…

गुंतवणुकदारांनी सध्या काय करावे?
सोन्याच्या किमतीत जारी उलथा-पालथीमुळे गुंतवणुकदार संभ्रमात आहे की, त्यांनी सोन्यात गुंतवणूक करावी किंवा अजून प्रतिक्षा करावी. तर, काही गुंतवणुकदार आपल्याकडे सध्याचे सोने विकणे किंवा रोखून ठेवण्याबाबत संभ्रमात आहेत.

आगामी काळात काय राहील ट्रेंड?
दिल्ली सराफा बाजारात सोने 17 सप्टेंबर 2021 ला मोठ्या घसरणीसह 45,207 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. या आधारावर सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 10,993 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहचले होते. जर सामान्यपणे पाहिले तर या भावात सोन्याची खरेदी फायद्याचा सौदा ठरू शकते.

यावर्षी कोणत्या स्तरावर पोहचू शकतात दर?
तज्ज्ञ सांगतात की, जगभरात कोरोना व्हॅक्सीनेशन अभियानाचा वेग वाढण्यासह लोक दुसर्‍या गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली आहे.

 

पुन्हा सोन्याकडे वळतील गुंतवणुकदार

मात्र, त्यांना वाटत नाही की ही स्थिती जास्त काळ कायम राहील.
जगातील बहुतांश शेयर बाजारांसह इंडियन स्टॉक एक्सचेंजने सुद्धा खुप वेग पकडला आहे.
आता मधून-मधून नफावसूलीमुळे बाजारात घसरण दिसत आहे.
शेयर बाजार जास्त वर गेल्याने नफ्यासह जोखिम सुद्धा वाढते.
अशावेळी मोठ्या संख्येने गुंतवणुकदार पुन्हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय सोन्याकडे वळू शकतात.

सोने 60,000 रुपयांचा स्तर पार करू शकते
यामुळे सोन्याच्या किमतीला पाठींबा मिळेल आणि त्या पुन्हा वाढण्यास सुरूवात होईल.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2021 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किमती नवीन स्तर गाठू शकतात.
अंदाज आहे की सोन्याच्या किमतीत वाढ सुरू झाली तर ती 60,000 रुपयांचा स्तर पार करेल.

Web Titel :- Gold Price | earning opportunity gold prices rupees 11000 cheaper from peak know how much prices will increase in 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th pay commission | राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या

Cash Management | सॅलरी घेणार्‍यांसाठी ‘कॅश मॅनेज’ करणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या सर्वात प्रभावी ‘या’ 10 पद्धत

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 140 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी