Gold Price Today : आठवडाभरात 3400 रुपयांनी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या पुढे आणखी स्वस्त होईल की, येईल तेजी…?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या किमतीत मागील आठवड्यात लागोपाठ घसरण दिसून आली. या आठवड्यात सराफा बाजारांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1015 रुपयांपर्यंत घसरला. तर, चांदी 1352 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सोने 3411 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याउलट चांदी 417 रुपयांनी महागली आहे. सराफा बाजारांत 24 कॅरेट सोन्याचा भाव मागील वर्षाच्या ऑल टाइम हायने 9463 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्डच्या किमतीत घसरणीसह व्यवहार होत आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 2.33 डॉलरच्या घसरणीसह 1,768.91 डॉलर प्रति औंसच्या रेटवर सुरू आहे. तर, चांदीचा व्यवहार 0.16 डॉलरच्या घसरणीसह 25.91 डॉलरच्या स्तरावर होत आहे.

21 एप्रिलला पोहचला होता 2 महिन्याच्या उच्च स्तरावर
वायदा बाजारात, शुक्रवारी सोन्याच्या किंमती 0.13 टक्केपेक्षा जास्त होत्या. म्हणजे 46,785 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार बंद झाला आहे. याशिवाय चांदी 68,423 प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. 21 एप्रिलला, एमसीएक्सवर सोन्याच्या दराने 48,400 रुपयांच्या 2 महिन्यांच्या उच्च स्तरावर हिट केले होते, परंतु यानंतर वेगाने कोसळला.

कोरोनाचा दिसत आहे सोन्यावर परिणाम
भारतात सोन्याच्या किमतीत 10.75 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटीचा समावेश आहे. मुंबईच्या एका डिलरने रॉयटरला सांगितले की, जवळपास प्रत्येक राज्य सरकारने कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कोविड -19 प्रतिबंध लावले आहेत. या कारणामुळे दागिन्यांची दुकाने एकतर बंद आहेत किंवा खुप कमी उघडत आहेत.

मार्चमधील मागणी कशी होती
जगातिक गोल्ड कौन्सिलने म्हटले की, या जून तिमाहीत, भारतात सोन्याचा वापर लॉकडाऊनमध्ये होण्याची अपेक्षा आहे. या उलट मार्च तिमाहीत भारताच्या सोन्याच्या मागणीत 37 टक्क्याने 140 टनची वाढ दिसून आली होती, डब्ल्यूजीसीनुसार, सोन्याच्या किमतीमधील नरमीमुळे मागणीत वाढ होती.