Gold Price Today : आज पुन्हा ‘स्वस्त’ झालं ‘सोनं’, चेक करा लेटेस्ट रेट्स, जाणून घ्या ‘किती’ घसरल्या किंमती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आजकाल भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) झपाट्याने घट होत आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीचा सोन्याचा वायदे (Gold price today) भाव प्रति दहा ग्रॅम 0.03 टक्क्यांनी घसरला. याखेरीज चांदीच्या दरातही घट झाली आहे. मार्चमधील चांदीचा वायदा भाव देखील प्रति किलोग्रॅम 0.22 टक्क्यांनी घसरला. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर मागील सत्रात सोन्याच्या किंमतींमध्ये 0.7 टक्क्यांनी तेजी नोंदवण्यात आली.

2 हजार रुपयांपर्यंत घसरली किंमत

शुक्रवारी 8 जानेवारी 2021 रोजी सोन्याच्या फेब्रुवारीच्या वायदा किंमती (Gold Future) प्रति 10 ग्रॅम 2,068 रुपयांनी घसरून 48,818 रुपयांवर आल्या. याशिवाय सोमवारीही सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली. त्याशिवाय चांदीच्या दरातही घट नोंदवण्यात आली. अधिक माहिती म्हणजे केंद्र सरकारने 2 लाख रुपयांहून अधिक सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक केले आहे, त्यानंतर किंमती कमी होतील असे मानले जात आहे.

आज सोन्याची किंमत काय आहे ते जाणून घ्या

एमसीएक्सवर आज फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 14 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 49,328 रुपये झाला. तर चांदीचा दर 155 रुपयांनी घसरून प्रति किलोग्रॅम 65,400 रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आज सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ नोंदली गेली, परंतु डॉलरची बळकटी हळूहळू नाहीशी झाली. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वधारून 1847.96 डॉलर प्रति औंस तर चांदीची किंमत 0.8 टक्क्यांनी वाढून 25.11 डॉलर प्रति औंस झाली.

भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली येण्याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीतील घट. त्याचवेळी अमेरिकी बाँडचे उत्पादन वाढल्याने आणि डॉलरला बळकटी मिळाल्याने दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत खाली आली आहे.

स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे सरकार

केंद्र सरकार आपल्याला यावेळी स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. दहाव्या सिरीज अंतर्गत गुंतवणूकदार 11 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. रिझर्व्ह बँकेने एक ग्रॅम सोन्याची किंमत 5104 रुपये ठेवली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि डिजिटल मोडमध्ये पैसे दिले गेले असतील तर त्याला प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल.