खुशखबर ! सोन्याच्या दरात ‘कमाली’ची घसरण, आठवड्यात 2 दिवसात 1669 रूपये ‘घट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग उच्चांकी विक्रम नोंदवल्यानंतर या आठवड्याच्या सुरूवातीपासून सोन्यात घट दिसून येत आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांच्या व्यापारात सोन्यात 1600 रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे.

वायदा बाजारात एमसीक्सवर सोन्याचा वायदा भाव मंगळवारी ४२४ रुपये घसरून ५४,५२२ रुपये प्रति १० ग्रामवर गेला. मात्र दिवभरात व्यापारादरम्यान हा ५४,५७० पर्यंतही गेला होता. सोमवारी हा भाव ५४,९४६ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता.

भारतीय हाजीर बाजारात इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट गोल्ड ९९९ चा सोमवारचा भाव ५४,५२८ रुपये प्रति १० ग्राम आहे.

विशेष म्हणजे की, सोने मागच्या आठवड्यात शुक्रवारी आपल्या सर्वात उच्चांकी पातळीवर ५६,१९१ रुपये प्रति १० ग्रामवर गेले होते. हा दर पाहिल्यास सोन्याच्या भावात आज सुमारे १६६९ रुपयांपर्यंत घट झाली आहे.

चांदीही घसरली
दुसरीकडे वायदा बाजारात चांदीचा सप्टेंबरचा वायदा भाव ७२० रुपये घसरून ७४,६६७ रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत होता. व्यापारादरम्यान चांदी ७५,०१० रुपये उच्चांकी पातळीवर गेली होती.

आंतरराष्ट्रीय हाजीर बाजारात सोने अर्ध्या टक्क्याने घसरून २,०१७.९८ डॉलर प्रति औसपर्यंत गेले होते. आंतरराष्ट्रीय वायदा बाजारात कॉमेक्सवर सोने सुमारे अर्ध्या टक्क्याने घसरून २,०१४ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होते.

का झाली घट ?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती घसरल्या, त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. अमेरिका-चीनमधील वाढत्या तणाव आणि डॉलरच्या वाढीमुळे सोन्याचे व्यापारी सावधगिरी बाळगत आहेत. एवढेच नव्हे तर बरेच लोक आता सोन्यात नफा कमावत आहेत. डॉलर बळकट झाला आहे आणि आशियाई चलनांच्या तुलनेत एका आठवड्याच्या उच्च पातळीवर चालला आहे.