आगामी 2 महिन्यात आणखी दोन हजारांनी वाढू शकतो सोन्याचा दर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जानेवारीमध्ये सराफ बाजारात सुरू झालेली सोन्याची तेजी अद्यापही दर उतरले नाहीत. यंदा सोन्याचे दर गगनाला भिडले असून 10 ग्राम सोन्याचे दर 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. येत्या दोन महिन्यात आणखीन 2 हजार रुपयांनी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतीय सराफा बाजारात दिवाळीआधी सोन्याच्या किंमती सध्याच्या पातळीवर प्रति 10 ग्रॅम 2000 रुपयांवरून वाढून 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. सोन्याच्या वाढणार्‍या किंमतींचा विचार करता 2021 मध्ये सोन्याची प्रति तोळा 65 हजार रुपयांवर पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा सराफ बाजारात सुरू आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात मंदीसारखी स्थिती निर्माण होईल त्यामुळे सराफ बाजारातील देव-घेव संथ होऊ शकते. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, जागतिक उत्पादन घट होऊन 4.9 टक्क्यांवर येईल, तर विकसनशील देशांमध्ये वाढीचा दर 3 टक्क्यांपर्यंत खाली येईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे वळू शकतात. त्यामुळे सोन्याची किंमती वाढल्या आहेत. त्याशिवाय अमेरिका आणि चीन आणि भारत-चीन यांच्यातील तणावामुळे सोन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like