Gold Price | सोन्याची जोरदार वाटचाल, मे 2021 नंतर दिसून आली सर्वात मोठी साप्ताहिक तेजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Russia – Ukraine War मुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. क्रूड ऑईलपासून महागाईपर्यंत नवनवीन समस्या समोर येत आहेत. जगभरात कमोडिटीजच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे (Gold Price). एमसीएक्सवर सोन्याच्या दरात मे 2021 नंतर सर्वात मोठी तेजी दिसून आली आहे. आज एमसीएक्स गोल्ड प्राईस 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅमवर दिसत आहे. बहुतांश कमोडिटी एक्सपर्टचे म्हणणे आहे की, नजीकच्या काळात सोने 54,000 रुपयांचा स्तर गाठू शकते. (Gold Price)

 

Religare Broking च्या सुगंधा सचदेव यांचे म्हणणे आहे की, रशिया आणि यूक्रेन युद्धाने बाजारात रिस्क सेंटीमेंट वाढवले आहे. परिणामी लोक सोन्यात जास्त गुंतवणूक करताना दिसत आहेत. सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाची गरज आणखी वाढली आहे. वाढत्या जियोपॉलिटिकल तणावादरम्यान या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मे 2021 नंतर सर्वात मोठी साप्ताहिक वाढ दिसून आली. (Gold Price)

 

सोन्यात आणखी तेजीची शक्यता
रशिया आणि यूक्रेनमधील लढाई जसजशी गंभीर रूप घेत जाईल.
त्याप्रमाणे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ पहायला मिळू शकते.
या दरम्यान दुसरी कमोडिटी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत आलेल्या उसळीमुळे महागाईशी संबंधीत चिंता आणखी वाढली आहे.
ज्यामुळे लोक महागाईला तोंड देण्यासाठी हॅजिंग धोरणांतर्गत सोन्यात खरेदी करताना दिसत आहेत.

रुपयाची स्थिती वाईट
IIFL Securities च्या अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, हाजिर बाजारात 2022 मध्ये आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 2.48 टक्के घसरला आहे तर 1 आठवड्यातच तो 1.10 टक्के घसरला आहे.
अंदाज आहे की कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारताकडून डॉलर काढण्यात आता आणखी तेजी दिसून येईल ज्यामुळे रूपया आपल्याला नजीकच्या काळात 77 च्या लेव्हलवर जाताना दिसू शकतो.

अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयात येणार्‍या 1 रुपयाचा बदल सोन्याच्या प्रती 10 ग्रॅमच्या किमतीत 250 – 300 रुपयांचा बदल आणतो.
अशावेळी रुपयाची कमजोरी एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीच्या वाढीचे आणखी एक कारण असू शकते.

अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, एमसीएक्स गोल्डची खरेदी 51,500 – 51,800 च्या रेंजमध्ये 53,800 – 54,000 रुपयांच्या टार्गेटसाठी करता येऊ शकते.
यासाठी 51,000 रुपयांचा स्टॉपलॉस आवश्य लावा.

 

Web Title :- Gold Price | gold price golds stormy move the biggest weekly rally seen in gold after may 2021

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा