Gold Price | धनत्रयोदशीला खरेदी करा सोने, दिवाळीनंतर 8000 रुपयांनी होऊ शकते महाग!

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali 2021) आणि धनत्रयोदशीला (Dhanteras 2021) तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ताबडतोब खरेदी करा. दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीत (Gold Price on diwali 2021) जोरदार तेजी दिसू शकते. सध्या बाजारात सोन्याचा दर सुमारे 46 ते 47 हजारच्या दरम्यान आहे आणि येत्या काही दिवसात लवकरच सोन्याचा दर (Gold Price) वाढणार आहे. दिवाळीनंतर सोन्याचा दर 53000 च्या पुढे पोहचू शकतो.

53000 रुपयांवर जाऊ शकतो सोन्याचा दर

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनुसार, सोन्याची किंमत लवकरच 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचू शकते. यावेळी सोन्याचा दर सुमारे 46000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे.

या हिशेबाने पाहिले तर सोन्याच्या किमतीत सुमारे 7000 ते 8000 रुपये प्रति 10 ग्रॅमची उसळी पहायला मिळू शकते. अशावेळी तुम्ही आता सोने खरेदी केले तर चांगला फायदा होऊ शकतो.

9000 रुपये सस्ता मिल रहा सोना

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने बाजारात नवीन विक्रम केला होता. त्यावेळी सोन्याचा दर 56200 रुपयांच्या स्तरावर गेला होता. जर सर्वोच्च स्तरापासून पाहिले तर सोने अजूनही 9000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

शुक्रवारी 271 रुपयांनी घसरले होते सोने

दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price) शुक्रवारी 271 रुपयांची घसरण पहायला मिळाली होती.
या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,887 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाला होता.
तर, त्याच्या मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा दर 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाला.

हे देखील वाचा

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

Nawab Malik | नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट ! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप (व्हिडिओ)

Mumbai Local Train | मुंबईकरांची लोकल प्रवासकोंडी दूर होणार, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price | gold price may hike upto 53k after diwali 2021 so buy it now and get good return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update