Gold Price | या आठवड्यात अचानक इतके स्वस्त झाले होते सोने, आता दरात आली तेजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price | गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Price) किंचित वाढ झाली आहे. जागतिक बाजारात (Global Market) सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र, भारतीय बाजारात सोन्याचा भाव अजूनही 51 हजारांच्या खालीच आहे.

 

मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्यात तेजी नोंदली गेली आहे. शुक्रवारी (9 सप्टेंबर) भारतीय सराफा बाजारात सोन्याचा दर 50,779 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या आठवड्यात सोन्याचा दर (Weekly Gold Price) बुधवारी नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र, आठवडा संपता-संपता सोन्यात रिकव्हरी दिसून आली.

 

या आठवड्यात किती घसरला सोन्याचा भाव
सोमवारी, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सोन्याच्या दरात मागील आठवड्याच्या (Weekly Gold Price) तुलनेत तेजी दिसून आली. सोन्याचा दर 50,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मंगळवारी त्याच्यात आणखी तेजी दिसली आणि तो 50,865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

 

बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊन तो नीचांकी पातळीवर गेला. या दिवशी सोन्याचा भाव 50,422 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस सोन्याचे दर वाढले आहेत. गुरुवारी सोन्याचा भाव 50,770 आणि शुक्रवारी 50,779 वर बंद झाला.

 

किती महाग झाले सोने
जर मागील आठवड्याच्या तुलनेत पाहिले तर या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 309 रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 50,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

 

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या तेजी दिसून आली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोने 0.4 टक्क्यांनी वाढून 1,713.62 डॉलर प्रति औंसवर पोहचले.
रॉयटर्सनुसार, अमेरिकन सोने वायदा 0.3 टक्क्यांनी वाढून 1,724.90 डॉलरवर व्यवहार करत होते.

24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 9 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,877 रुपये होता.
तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 50,673 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

 

सर्व प्रकारच्या सोन्याच्या दराची गणना कराशिवाय करण्यात आली आहे.
सोन्यावर जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात.
जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्यावर कराशिवाय मेकिंग चार्जेस लागू होतात. त्यामुळे दागिन्यांच्या किमती वाढतात.

 

Web Title :- Gold Price | gold price weekly 5 to 9 september know the new rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या