Gold Price Today : महिन्याभरात 5500 रूपयांपर्यंत स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची मागणी वाढल्यामुळे जगभरात सोन्याच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. मात्र मंगळवारी परदेशी बाजारात खरेदी परतल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून येत आहे. दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ६६३ रुपयांनी वाढला. तसेच या दरम्यान चांदीच्या भावात १,३२१ रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, परदेशी बाजारासह देशांतर्गत वायदा बाजारात मंगळवारी सोन्यात वाढ झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या वादाकडे लागले आहे. तसेच अमेरिकेत मदत पॅकेजशी संबंधित नव्या विधेयकावरही लक्ष आहे.

सोन्याचा नवीन भाव

एचडीएफसी सिक्यूटिरीजनुसार, दिलीत ९९.९ शुद्ध सोन्याचा भाव ६६३ रुपयांनी वाढून ५१,३६७ रुपये प्रति १० ग्रामवर गेला आहे. मागील सत्रात म्हणजे सोमवारी व्यापार संपल्यानंतर सोने ५१,३६७ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाले होते.

चांदीचा नवीन भाव

सोन्यासह चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. मंगळवारी १ किलोग्रॅम चांदीचा भाव १,३२१ रुपयांनी वाढून ६१,९१९ रुपये प्रति किलोग्रॅमवर गेला. तर याच्या एक दिवस अगोदर सोमवारी चांदी ६०,५९८ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

सोन्या-चांदीत वाढ का झाली?

एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्ली सराफा हाजीर बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ६६३ रुपयांनी वाढला. हे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या वाढीचा कल दर्शवते. ते म्हणतात की, रुपयात आलेल्या कमजोरीचा परिणामही सोन्याच्या भावावर दिसून आला आहे.

देशांतर्गत वायदा बाजारात सोन्यात सुरुवातीच्या व्यापारात किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचा ओक्टोबरचा वायदे भाव ६७ रुपये म्हणजे ०.१३ टक्क्यांनी वाढून ५०,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला. सोमवारी ऑक्टोबरचा वायदा भाव ५०,१३३ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. मंगळवारी चांदीमध्येही वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सुरुवातीच्या व्यापारात तो २८९ रुपयांनी म्हणजेच ०.४८ टक्क्यांनी वाढून ६०,६८५ रुपये प्रति किलोग्रामवर गेला.