Gold Price | सोने विकत घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; तज्ज्ञाने व्यक्त केलं ‘हे’ मत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकेच काय आपल्याकडे सोने खरेदीसाठी (Gold Price) सुद्धा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन, दसरा, पाडवा इत्यादी दिवस आपल्याकडे सोने विकत घेण्यासाठी शुभ मानले जातात. पण त्याशिवाय लग्नसराईतही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते. तुळशी विवाह संपन्न झाला की, आपल्याकडे लग्नाच्या तारखा निघायला सुरुवात होते. त्यामुळे या काळात सोन्याच्या किमती (Gold Price) गगनाला भिडतात. जर तुमच्या घरात शुभ कार्य असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

 

कारण की, डिसेंबरअखेर सोन्याचे दर (Gold Price) पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबरपासून 2022 पासून सोने आणि चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याची किंमत 53 हजार रुपयांच्या वर गेली आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही आज 64 हजारांच्या वर गेला आहे. सोन्याचा भाव सध्या गेल्या साडेतीन महिन्यांतील विक्रमी स्तरावर आहे, तर चांदीने 7 महिन्यांची उच्चांकी गाठली आहे.

 

सोमवारी (१ डिसेंबर) रोजी सोन्याच्या किमती ०.८३ टक्क्याने वाढल्या, तर चांदीच्या दरात २.२३ टक्के वाढ झाली आहे.
जागतिक बाजारात अशीच वाढ होत राहिली तर देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ५६ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title :- Gold Price | gold rate high on december end 56 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर