Gold Rates Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. सोन्याची चमक हळूहळू कमी होऊ लागली आहे. मागील 11 महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारी महाशिवरात्र असल्याने सराफा बाजार बंद होता. आज (शुक्रवार) सकाळी साडेनऊ वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजार सुरू झाला. आज सकाळी बाजार खुला होताच सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली.

MCX वर आज एप्रिलच्या सोन्याच्या वायदा भावात 138 रुपयांची घट झाली. सकाळी बाजार खुला होताना सोन्याचा भाव 44 हजार 741 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. बुधवारी बाजार बंद होताना सोन्याचा दर 44 हजार 879 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने प्रतितोळा 169 रुपयांनी घसरले आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातदेखील घसरण सुरू आहे. आज सकाळी एमसीएक्सवर बाजार खुला झाला, त्यावेळी वायदा बाजारात चांदीच्या दरात 345 रुपयांची घसरण झाली. सकाळी बाजार खुला झाला. त्यावेळी चांदीचा दर 67 हजार 200 रुपये होता. बुधवारी बाजार बंद होताना चांदीचा दर 67 हजार 545 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. सध्या चांदीचा दर 67 हजार 160 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहे.

सोन्याच्या दरात घट होण्याची कारणे

– कोरोना प्रभावी लस आली
– अमेरिकेत सरकारी बॉण्डसना मागणी वाढली
– जागतिक भांडवली बाजारामध्ये तेजी
– अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत झाला
– या सर्व गोष्टी जुळून आल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली.

सोन्यातील गुंतवणूक आणि वाढती मागणी

– अनेक जण सोन्याचे दागिने करून ठेवतात
– गुंतवणूक म्हणून लोक सोने खरेदी करतात
– सोन्याचे आकर्षण भारतात जास्त असल्याने मागणी वाढली
– दरवाढीमुळे सोन्याच्या मागणीत घट
– सोन्याचे दर घसरल्याने सोन्याला पुन्हा मागणी वाढली