जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन – सोने-चांदीच्या किमतीत दररोज चढउतार होतात. आता तुलशी विवाहानंतर लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात बदल झाले आहेत. शनिवारी (दि. 28) 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 10 रुपयांनी कमी झाले असून, दर 48,660 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 47,660 रुपये प्रतितोळ्यावरून कमी होऊन 47,650 रुपये प्रतितोळा झाले आहेत. जाणून घेऊया आपल्या शहरातील सोन्याच्या आजच्या किमती.

दिल्ली आणि मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 51,820 रुपये प्रतितोळा आणि 48,650 रुपये प्रतितोळा आहे, तर या दोन्ही शहरात 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 47,510 रुपये प्रतितोळा आणि 47,650 रुपये प्रतितोळा असे आहेत, तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे 45,900 रुपये प्रतितोळा 50,060 रुपये प्रतितोळा झाले आहेत.
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 49,810 रुपये प्रतितोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 52,010 रुपये प्रतितोळा आहेत.

बंगळुरू आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 45,460 रुपये प्रतितोळा आहेत, 24 कॅरेट सोन्याचे दर 49,590 रुपये प्रतितोळा असे आहेत. केरळमध्ये शनिवारी (दि. 28) 22 कॅरेट सोन्याचे दर 45,460 रुपये प्रतितोळा आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 49,590 रुपये प्रतितोळा आहेत, तर पुणे आणि अहमदाबादमध्ये हे दर अनुक्रमे 47,650 रुपये आणि 48,290 रुपये प्रतितोळा आहेत.

गोल्ड स्पॉटची किंमत शुक्रवारी 48,850 रुपये प्रतितोळावरून कमी होऊन 48,800 रुपये प्रतितोळा झाली आहे. शुक्रवारची ही किंमत या आठवड्याच्या सरासरी किमतीपेक्षा कमी आहे. मागील आठवड्यात सोन्याची सरासरी किंमत 50,000 रुपये प्रतितोळा होती. आंतरराष्ट्रीय बाजारासंदर्भात बोलायचे झाले तर शुक्रवारी सोन्याचे दर 1,890 डॉलर प्रतिऔंस आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची वायदे किमती 0.19 टक्क्यांनी वाढून 50,858 रुपये प्रतितोळा झाली आहे.

चांदीची घसरण सुरूच
चांदीची घसरण आजही सुरूच आहे. शनिवारी चांदीचे दर 400 रुपयांनी कमी होऊन 59,200 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 23 डॉलर प्रतिऔंस होते.